सावंतवाडी : प्रतिनिधी
माध्यमिक विद्यालय डेगवे शाळेला शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या तर्फे पाणी फिल्टर देण्यात आला. शाळेच्या विद्यार्थ्यांना चांगले स्वच्छ फिल्टर पाणी पिण्यास मिळावे व त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी कटीबद्ध असणारे व शिक्षणाचे महत्व जाणणारे शिवसेना उप तालुका प्रमुख माजी सरपंच मंगलदास देसाई शिवसेना उपविभाग प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकरांकडे मागणी केली असता तात्काळ मागणीचा पुरवठा करण्यात आला. तसेच मंत्री दिपक केसरकर यांचे आभार शाळेतील सर्व शिक्षक ,कर्मचारी वर्ग ,विद्यार्थी मित्र व पालक ,ग्रामस्थ यांनी खास करुन आभार मानले. मंगलदास देसाई, विजय देसाई यांनाही त्यांच्या राजकिय विकासात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









