सावंतवाडी : प्रतिनिधी
शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी वाहिली श्रध्दांजली
सिंधुदुर्ग माजी सैनिक संघटना, सैनिक स्कूल, सैनिक पतसंस्था तसेच कॅथलिक अर्बन बँकचे संस्थापक, सहकारातील जेष्ठ नेते पी.एफ.डान्टस यांच्या पार्थिवावर असंख्य ख्रिस्ती बांधव ,चाहता वर्ग, मित्रमंडळी, सर्व पक्षीय राजकीय नेते यांच्या उपस्थितीत सोमवारी न्यू खासकिलवाडा येथील सेमिस्ट्रीमध्ये प्रार्थना करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध संघटना, संस्था व मान्यवरांकडून पुष्पांजली वाहण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,माजी आमदार राजन तेली, राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे परब, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनीही उपस्थित राहून पुष्पांजली वाहिली.यावेळी सैनिक पतसंस्था अध्यक्ष बाबुराव कविटकर ,उपाध्यक्ष शिवराम जोशी, सैनिक पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील राऊळ , कॅथलिक अर्बनचे उपाध्यक्ष रुजाय राॅड्रीस , कॅथलिक अर्बनचे संचालक, कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी ,सहकारी सिंधुदुर्गनगरी पतसंस्थेचे अध्यक्ष भाग्यवंत वाडीकर, संचालक प्रकाश आंडणेकर, माजी संचालक राजू तावडे, राजू सावंत, सचिव निलेश कुडाळकर, माजी सचिव परब, व पतसंस्थेचे सर्व कर्मचारी यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. कॅथलिक व्हा चेअरमन राज्य सरकारी कर्मचारी सहकारी सिंधुदुर्गनगरी पतसंस्थेचे अध्यक्ष भाग्यवंत वाडीकर, संचालक प्रकाश आंडणेकर, माजी संचालक राजू तावडे, राजू सावंत, सचिव निलेश कुडाळकर, माजी सचिव परब, व पतसंस्थेचे सर्व कर्मचारी ,निवृत्त सैनिक संघाचे तातोबा गवस चंद्रशेखर जोशी,अशोक म्हाडगुत , सिंधुदूर्ग धर्म प्रांत बिशप आलविन बरेटो, तहसिलदार श्रीधर पाटील ,प्रा. विलास सावंत, मार्टिन आल्मेडा, डाॅ विलास सावंत, बापू गावडे, जेम्स बोर्जेस, वैशाली गावडे, व्हिक्टर डॉन्टस, दीपक राऊळ, प्रकाश सावंत, फादर मिलेट डिसोजा, ऑगस्तिन फर्नाडिस, भिवा गावडे, सुनिल राऊळ, बाबु कुडतरकर, बबन राणे, नितिन गावडे, विक्रम चव्हाण, डाॅ. वसंत पाटील, मनोज नाईक, नारायण राणे, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉन्टस, गजानन नाटेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, सुरेश भोगटे, बावतीस फर्नाडीस माजी.प.स.सदस्य बाबल आल्मेडा, आगोस्तीन फर्नाडिस, विल्यम फर्नाडिस, निवृत्त कर्नल विजय सावंत, दिनानाथ सावंत,आदींनी उपस्थित राहून पी.एफ.डान्टस याना आदरांजली वाहिली.









