सावंतवाडी / प्रतिनिधी
Education Minister Deepak Kesarkar offered a wreath to Babasaheb’s statue!
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्किल डेव्हलपमेंट शिक्षण प्रणाली अपेक्षित होती. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नव्या शैक्षणिक धोरण आखले आहे. त्यामध्ये व्यावसायिक आणि स्किल डेव्हलपमेंट शिक्षण प्रणाली आहे . ही शिक्षण प्रणाली आजच्या नवतरुणांना व्यवसाय भिमुख व रोजगारभिमुख करणारे असे आहे. असे रोजगार व्यवसाय प्रमुख शिक्षण प्रणाली आता नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. या नव्या शैक्षणिक स्किल डेव्हलपमेंट शिक्षण प्रणालीमुळे सर्व घटकातील व्यक्तींना रोजगार व्यवसाय उपलब्ध होणार आहेत . आपण लवकरच राज्याच्या उद्योग मंत्रालय विभागाच्या मार्फत सावंतवाडी शहरात उद्योग रोजगार परिषद घेऊन त्याद्वारे उपेक्षित दुर्लक्षित समाजातील तरुण बेरोजगारांना व्यवसाय उद्योगा चे प्रशिक्षण दिले जाणार आहे . अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले . श्री केसरकर आज पासून दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ते सावंतवाडी समाज मंदिर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी येथे भेट दिली व येथील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून त्यांच्या हस्ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला .