सिंधुदुर्गनगरी –
राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी तालुका पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.सिंधुदुर्ग नगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भवन येथील झालेल्या कार्यक्रमानंतर त्यांनी सावंतवाडीतील पत्रकारांशी भेट घेऊन त्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार,माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, कार्यकारणी सदस्य नरेंद्र देशपांडे, सोशल मीडियाच्या अनुजा कुडतरकर आदी उपस्थित होते.यावेळी त्यांनी पत्रकारांची आस्थेने विचारपूस केली.









