शेखर सामंत ,
सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारीपदी श्री. किशोर तावडे (भा.प्र.से.)यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हाधीकारी के. मंजुलक्ष्मी (भा.प्र.से.)यांची बदली कोल्हापुर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी झाली आहे. नवनिर्वाचीत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी यापुर्वी सिंधुदुर्गात सहाय्यकजिल्हाधिकारी म्हणुन सेवा दिली होती.सिंधुदुर्गचे नवनियुक्त जिल्हाधीकारी तावडे यांचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर.यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले मंत्री दीपक केसरकर यांचेमंत्रालय सहाय्यक सचिन वालावलकर यांनीही नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या .