वृत्तसंस्था/ चेन्नाई
पुष्पा, आरआरआर आणि पोन्नियिन सेल्विन यासारख्या बहुचर्चित चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या लायका प्रॉडक्शन कंपनीच्या चेन्नईतील कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी मंगळवारी छापा टाकला. पोलीस सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी या छाप्याबाबत प्रॉडक्शन कंपनीकडून तातडीने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. केंद्रीय तपास संस्थेने लायका प्रॉडक्शन हाऊसविऊद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवल्यानंतर चेन्नईतील सुमारे आठ परिसरांची झडती सुरू करण्यात आली आहे. लायका प्रॉडक्शनची स्थापना 2014 मध्ये सुबास्करन अलीराजा यांनी केली होती. ही कंपनी ‘लायका मोबाईल’चा एक उपसमूह आहे.









