प्रतिनिधी/ बेंगळूर
सुमारे 15 कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कन्नड अभिनेत्री रान्या रावची 34.12 कोटी ऊपयांची स्थावर मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी तात्पुरती जप्त केली. आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात बेंगळूर आणि तुमकूर जिल्ह्यातील मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बेंगळूरच्या व्हिक्टोरिया लेआउटमधील घर, अर्कावती लेआउटमधील एक भूखंड, तुमकूरमधील औद्योगिक भूखंड आणि आनेकल तालुक्मयातील शेती जमीन जप्त करण्यात आली आहे.









