अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्यांनी मंगळवारी चेन्नईतील चित्रपट निर्मिती कंपनी लायकाच्या कार्यालयाची झडती घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आले आहे. या छाप्यांनंतर लायका प्रॉडक्शन कंपनीकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नाही.
Lyca या प्रॉडक्शन कंपनीने ‘पोन्नियिन सेल्वन’ 1 आणि 2 या बॉक्स ऑफिसवर हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. मणिरत्न यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय, त्रिशा, कार्ती, विक्रम अशी मोठी स्टारकास्ट आहे. ऐतिहासिक चित्रपट असलेला पोनियन सिलवन हा बीग बजेट चित्रपट म्हणूनही ओळखला जातो. या चित्रपटाने भारतात आणि परदेशात चांगला गल्ला जमवल्याचे दिसून आले. तरीही या प्रोडक्शन हाउसच्या अर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता आढळल्याने केंद्रीय तपास संस्थेने या प्रॉडक्शन हाऊसविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर चेन्नईतील सुमारे आठ ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत.
Lyca Productions ची स्थापना सुबास्करन अल्लिराजा यांनी 2014 मध्ये केली आहे. Lycamobile च्या एका उपसमूहाने फिल्म प्रॉडक्शन स्टुडिओची स्थापना करून साउथमधील चित्रपटांच्या निर्मिती आणि वितरणामध्ये गुंतवणूक केली आहे.









