भ्रष्टाचाराप्रकरणी अटकेत राज्याचे मंत्री
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांच्या 10 ठिकाणांवर ईडीने मंगळवारी छापे टाकले आहेत. मंत्र्यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयातही झडती घेण्यात आली आहे. बालाजी हे सध्या पुझल केंद्रीय तुरुंगात आहेत. मंत्र्यांच्या कोइम्बतूर, करूर आणि तिरुचि येथील निकटवर्तीयांवर ईडीकडून करण्यात आली आहे. बालाजी यांना 14 जून रोजी ईडीने अटक केली होती.
अण्णाद्रमुक सरकारमध्ये मंत्री असताना नोकरीच्या बदल्यात रक्कम स्वीकारल्याच्या घोटाळ्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगसंबंधी ईडीने सेंथिल बालाजी यांची चौकशी करत त्यांना अटक केली होती. अटकेनंतर बालाजी यांनी छातीत वेदना होत असल्याची तक्रार केल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांची प्रकृती सुधारल्यावर बालाजी यांना आता पुझल केंद्रीय तुरुंगातील वैद्यकीक वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.









