मुंबई
बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या घरावर सक्त वसुली संचलनालय (ईडी) चा छापा पडला आहे. मोबाईल अॅपद्वारे पोर्नोग्राफिक कंटंट निर्मिती आणि वितरणाशी संबंधित मनी लॉंड्रींग चौकशीच्या संदर्भात राज कुंद्रा यांच्यासह मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये १५ ठिकाणांवर हे छापे टाकले आहेत.
लंडनच्या हॉटशॉट अॅपला पॉर्न तयार करुन विकल्याच्या आरोपाखाली २०२१ मध्ये मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांतर्गत राज कुंद्राची इडी करुन चौकशी सुरू आहे. राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेने भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्र्याच्या विविध कलमांतर्गत जुलै २०२१ मध्ये अटक केली होती.









