रियल इस्टेट कंपनीशी निगडित प्रकरण
वृत्तसंस्था/ चेन्नई
ईडीने सोमवारी तामिळनाडूत अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीने तामिळनाडूचे नगरविकास मंत्री के.एन. नेहरू यांचे बंधू रविचंद्रन यांच्या रियल इस्टेट कंपनीच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. रविचंद्रन हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.
चेन्नईतील प्रमुख ठिकाणी म्हणजेच तेनाम्पेट, अलवरपेट, बेसेंट नगर, सीआयटी कॉलनी आणि एमआरसी नगरमध्ये 10 हून अधिक ठिकाणी ईडीने झडती घेतली आहे. संशयास्पद अवैध वित्तीय देवाणघेवाण प्रकरणी होत असलेल्या चौकशीच्या अंतर्गत हे छापे टाकण्यात आल्याचे समजते. तामिळनाडूत यापूर्वी 6 मार्च रोजी ईडीने राज्य विपणन निगममधील कथित अनियमिततेप्रकरणी छापे टाकले होते. राज्य विपणन निगम राज्यात भारतात निर्मित विदेशी मद्याच्या (आयएमएफएल) वितरणावर एकाधिकार राखून आहे. ईडीने त्यावेळी निगमच्या मुख्यालयासोबत प्रमुख मद्य ठेकेदार आणि डिस्टिलरीच्या कार्यालयांवर छापे टाकले होते.









