इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आता इडी आणि इतर संस्थांच्या चौकशीसाठी तयार राहीले पाहीजे असून आता त्यांच्या घरावरही छापे पडू शकतात. त्यामुळे आता त्यांनी तयारी ठेवली पाहीजे अशी भिती मत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आपले मत व्यक्त केले.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएचा विरोध करण्यासाठी ठोस रोडमॅप तयार करण्यासाठी विरोधी गटाच्या प्रमुख नेत्यांनी गुरुवारी मुंबईत आघाडीच्या तिसऱ्या दोन दिवसीय संयुक्त बैठकीत चर्चा केली. या बैठकीत बोलताना खरगे यांनी आपल्या समकक्ष नेत्यांना अशा प्रकारचा इशारा दिला आहे.
यावेळी बोलताना खरगे म्हणाले, “देशातील सरकार हे सुडबुद्धीने काम करत आहेत. येत्या काळात आपल्याला सावधान राहीले पाहीजे. इंडिया आघाडीतील नेत्यांची चैकशी या सरकारकडून केली जाऊ शकते. आपल्या आघाडीची जमीन जेव्हढी मजबूत असेल तेव्हढ्या चौकशीसाठी नरेंद्र मोदी प्रयत्न करणार आहेत. या सरकारने यापुर्वीही महाराष्ट्र, राजस्थान आणि प. बंगालमध्ये असे केले होते. आता त्यांनी छतीसगढ आणि झारखंडमध्येही असा प्रयत्न केला आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “इंडिया आघाडीच्या पहिल्या आणि दुसऱ्या सभेनंतर पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष हा इंडिया आघाडीवर टिका करत आहे हेच आपले यश आहे. नरेंद्र मोदी हे इंडिया आघाडीवर हल्ला करताना त्यांनी आघाडीची तुलना किंवा देशाच्या नावाची तुलना दहशतवादी संघटनांशी जोडली आहे.” असेही ते म्हणाले.
शेवटी बोलताना ते म्हणाले, “आज देशभरातून तिरस्कारातून गुन्ह्यांची सख्या वाढत आहे. बलात्कारितांना सोडून दिले जात आहे. कुकी महीलांवर अत्याचार केले जात आहेत. भाजप आणि आरएसएसने 9 वर्षात जो जातीय विष पेरले गेले आहे त्याचा तो परिणाम आहे.” असेही ते म्हणाले.









