वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशातील लखनौ येथील सहारा इंडियाच्या परिसरात ईडीच्या पथकाने छापा टाकला आहे. ईडीच्या कोलकाता युनिटने तेथील एका चिटफंड कंपनीतील कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. एजन्सीचे सुमारे 100 अधिकारी सहाराच्या लखनौ येथील कपूरथला येथील मुख्य कार्यालयात तपासासाठी दाखल झाले होते. इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे जमा करण्याबरोबरच फायलींचीही तपासणीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कारवाईदरम्यान ईडीच्या पथकाने सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त केले होते. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरू असली तरी प्रसारमाध्यमांना सविस्तर तपशील देण्यात आलेला नाही.









