दिल्लीमध्ये सीबीआयची कारवाई
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने गुऊवारी राष्ट्रीय राजधानीत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) सहाय्यक संचालकाला 20 लाख ऊपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली. संदीप सिंह यादव असे अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकाऱ्याचे नाव आहे. ईडीमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात आपल्या मुलाला दिलासा देण्याच्या बदल्यात तो एका ज्वेलर्सकडून लाच घेत होता. दिल्लीतील लाजपत नगर भागातून एका ईडी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीबीआयने सापळा रचून ईडीच्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. सीबीआय याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याच्या प्रक्रियेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.









