Jayant Patil : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाकडून आज निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बजावली आहे. आयएल आणि एफएलएस प्रकरणी जयंत पाटील यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप होता. ईडीकडून या प्रकरणी जयंत पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचं समन्स देण्यात आलं आहे. ईडीची कोणतेही नोटीस अद्याप मिळाली नसल्याचं जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. ILFS च्या माध्यमातून अनेक बड्या लोकांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे. ILFS प्रकरणात सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात आले. जयंत पाटील यांची ई़डीकडून चौकशी होणार आहे. या चौकशीला जयंत पाटील उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Previous Articleईडीसीकडून मुख्यमंत्र्यांना धनादेश सुपूर्द
Next Article काब्राल यांच्याकडून स्मार्ट सिटी कामांची पाहणी









