सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटं पसरवलं जात आहे. ईडी म्हणजे भाजपचे इलेक्शन डिपार्टमेंट आहे. जो सच्चा आहे तो आपल्यासोबत आहे, नाहीतर ईडी ला घाबरून भाजप सोबत गेले. यांचा इतिहास देशाच्या विरोधात गद्दारी करण्याचा आहे. स्वातंत्र्य चळवळीत हे गद्दारी करत होते. ज्यांचा इतिहासच काही नाही, ते खरा इतिहास पुसण्याचे काम करत आहेत.धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या हातात तलवार दिली जाते. मात्र यांची मुलं परदेशात शिक्षण घेत आहेत. धर्म धोक्यात आहे तर आपल्या मुलाच्या हातात तलवार द्या ना, सामान्य तरुणांच्या हातात का देता असा सवाल काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी करत भाजपवर निशाणा साधला.
आज ते कोल्हापूरात पत्रकारांशी संवाद साधत होते.
स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधताना कन्हैया कुमार म्हणाले की, स्मृती इराणी यांची कन्या गोव्यात रेस्टॉरंट काढणार आणि आम्ही स्वतःच पेट्रोल टाकून जय श्री राम म्हणत फिरत राहणार. राहुल गांधी यांची घराणेशाही म्हणता मग अमित शाह यांचा मुलगा bcci चा अध्यक्ष कसा? असा सवालही त्यांनी केला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, गुजरातच्या करमचंद यांनी देशासाठी सूट सोडला पण एका गुजरातीने 10 लाखाचा सूट घातला दोस्तीसाठी. गुजरात से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम ठोको. आज कल अजित दादा सलाम ठोक रहे है, अशी टीकाही अजित पवार यांच्यावर केली. सिंचन घोटाळ्याचा आरोप मोदी करतात आणि लगेच अजितदादा भाजपसोबत येतात. जर कोण चुकीचं आहे तर आहे. पहिल्यांदा ईडी पाठवली जाते. चोर आहे चोर आहे म्हणून सांगितलं जातं. भाजपमध्ये घेतल्यानंतर संत आहे संत आहे असं सांगितलं जातं. मोदी देशाच्या नागरिकांसोबत खोटं बोलले आहेत.खोटं बोलणाऱ्याला खोटं म्हणायचं नाही तर काय म्हणायचं.मोदींनी आरोप केलेल्या अजितदादा पवार यांच्या घराचा रस्ता आता ईडी विसरली आहे का? असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली.
कोल्हापूरची आठवण सांगताना ते म्हणाले की, माझ्या डोक्यावर हा कोल्हापुरी फेटा बांधला जात होता.
त्यावेळी मला भारत जोडो यात्रेच्या दरम्यान हिंगोलीतील कोल्हापुरी फेट्याची आठवण आली. महाराष्ट्रात प्रवेश करताना हजारो लोक फेटे बांधून होते. त्यावेळी महाराष्ट्र जागृत असल्याचे स्पष्ट दिसून आले. महाराष्ट्राने नेहमी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. परिवर्तनाची सुरुवात करताना राजीव गांधी यांची आठवण येणं स्वाभाविक आहे.पुन्हा एकदा देशात परिवर्तनाची सुरुवात करावी लागणार आहे. या देशाची माती आपल्याला सुरक्षित ठेवायची आहे. कोल्हापुरात मी मार्गदर्शन करण्यासाठी नाही तर मार्गदर्शन घेण्यासाठी आलो आहे.आपल्यापैकी जवळपास सगळ्यांना काँग्रेस नेत्यांबद्दल चुकीचा मेसेज आला असेल.स्वातंत्र्य चळवळीला बंगाल आणि महाराष्ट्रातून सुरू झाली होती. सोशल मीडियाची ताकद घेऊन आता पुन्हा एक आला आहे. सोशल नाही तर अनसोशल काम केली जातात. हळूहळू आपलं स्वातंत्र हिरावून घेतलं जातं आहे, असा नाराजीचा सुरही ओढला.








