वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ईडीचे संचालक संजय मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी घेऊन केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापुर्वी दिलेल्या निकालात बदल करण्याची विनंती केंद्र सरकारने बुधवारी केली. यापूर्वीच्या निकालानुसार ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांना 31 जुलैपर्यंतच पदावर राहता येणार आहे. तथापि, केंद्र सरकारने ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची गुऊवार, 27 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.
ईडी या तपास यंत्रणेकडून सध्या मनी लाँड्रिंगसह अन्य बऱ्याच महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास केला जात आहे. या सर्व प्रकरणांच्या क्रियाकलापांची सूक्ष्म जाण असलेली व्यक्ती या तपास यंत्रणेच्या प्रमुख पदावर असणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असा युक्तिवाद केला आहे.









