Sanjay Raut : ईडीच्या कारवाई खोट्या आहोत. जे-जे विरोधात बोलताहेत त्यांच्य़ा विरुध्द सीबीआय आणि ईडीची कारवाई सुरु आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीकडून कारवाई केली जातेय. मात्र याचा आम्हाला काही फरक पडत नाही जनता आमच्या पाठिशी आहे. या कारवायांचे उत्तर 2024 मध्ये दिसेल अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज ईडीने छापा टाकला यासंदर्भात ते बालत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, हसन मुश्रीफ यांच्यावर सुडबुध्दीने कारवाई केली जातेय. सदानंद कदम यांना अटक करण्याचं कारण काय? आज लालू यादव यांच्या घरावर कारवाई झालीय.अटकेची बातमी पहिली मुलुंडमधून येते याचा अर्थ काय? किरीट सोमय्यांच्या विक्रांत घोटाळ्याची चौकशी करा. भारतातील बॅंका बुडवणारे भाजपमध्ये काम करतात आणि आमच्यावर हल्ले करतात. हसन मुश्रीफांच्या कारखान्यांची नावे काढली. मी भविष्यामध्ये काही कारखान्यांची यादी देवेंद फडणवीस यांना पाठवणार आहे. त्या संदर्भात ईडी चौकशी करणार आहे का? असा सवाल यावेळी त्यांनी केला.
महाराष्ट्रामध्ये मविआ ज्या गतीने पुढे जात आहे. विशेषत: कसबा निकालानंतर जे वातावरण निर्माण झालं त्याला खिळ घालण्यासाठी ईडीच्या कारवाई सुरु आहेत. सगळ्या कारवाया बोगस आहेत. अनिल देशमुख, संजय राऊत प्रकरणात कोर्टान स्पष्ट केलं आहे. नवाब मलिक या प्रकरणात त्यांचा बुरखा फाटेल. विरोधकांच्या बाबतीत ईडी आणि सीबीायच्या गैरवापरबाबात या देशातल्या प्रमुख नऊ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहलं. त्यावर महाराष्ट्रातून उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सह्या आहेत. मात्र तरीही मनमानी पध्दतीने कारवाई सुरुच आहे. काहीही झाले तरी आम्ही गुडघे टेकणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








