उत्तर प्रदेश, हरियाणातील मालमत्ता जप्त
वृत्तसंस्था/चंदीगड, लखनौ
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वादग्रस्त युट्यूबर एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया या दोघांवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. ही कारवाई करण्यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी दोघांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत. दीर्घ चौकशीनंतर कोट्यावधी ऊपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सापाच्या विषाच्या खरेदी-विक्रीप्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विश यादवला अटक केली होती. त्यानंतर ईडीने त्याच्याविऊद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. एल्विश यादवने गुन्ह्यातून मिळालेली रक्कम आणि रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी बेकायदेशीर निधी वापरण्यासाठी राहुल फाजिलपुरिया यांची मदत घेतल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने एल्विश यादव विऊद्ध रेव्ह पार्टी प्रकरणात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील नोएडा येथे त्याच्याविऊद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरची अंमलबजावणी संचालनालयाने स्वत:हून दखल घेत त्याच्याविऊद्ध गुन्हा नोंदवला.
बँक खात्यांची तपासणी
अंमलबजावणी संचालनालयाच्या सूत्रांनी सांगितले की, एल्विश यादवच्या बँक खात्याच्या तपशिलांसह, त्याने मिळवलेल्या संपत्तीचीही तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतरच त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच गुरूग्राम पोलिसांनी राहुल फाजिलपुरिया आणि एल्विश यादव यांच्याविऊद्ध म्युझिक व्हिडिओमध्ये दुर्मिळ प्रजातीचे साप आणि 32 बोअर पिस्तूल वापरल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.









