अंमलबजावणी संचालनालयाने आज बीबीसी इंडियाविरुद्ध परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेऊन गुन्हा दाखल केला आहे. इंग्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या बीबीसी या जगद्विख्यात ब्रॉडकास्टर कंपनीच्या भारतीय एजन्सीला किंवा शाखेला सरकारी यंत्रणाच्या तपासाला तोंड देण्याची ही पहिलीच वेळ आहे. बीबीसीने गुजरात दंगलीवर आधारीत इंडिया : द मोदी क्वेश्चन या माहितीपट तयार करून प्रदर्शित केला होता. त्यानंतर हा वाद सुरु झाला.
फेब्रुवारीमध्ये, आयकर अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीचा भाग म्हणून भारतातील बीबीसी कार्यालयांची झडती घेण्यात आली होती. आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले की, बीबीसीच्या लेखा परिक्षणामध्ये अनियमितता दुसून येत आहे. बीबीसी समूहाने परदेशी संस्थांद्वारे भारतातील उत्पन्नावर कर भरला गेला आहे कि नाही याचीही तपासणी होईल असे निवेदनात म्हटले आहे.
ईडीने बीबीसीकडून फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट () नुसार कागदपत्रे आणि कंपनीच्या काही अधिकाऱ्यांचे स्टेटमेंट रेकॉर्डिंग मागवले आहे. तसेच एफडीआयच्या उल्लंघनसंदर्भात बीबीसीची चौकशीही होणार आहे. FEMA हा परकीय चलन व्यवस्थापन कायदा आहे जो परकीय चलनाचा प्रवाहावर नियंत्रित ठेवतो.