कोलकाता :
अर्थतज्ञ आणि माकपचे माजी नेते प्रसेनजीत बोस यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्यघटना वाचविण्यासाठी मी काँग्रेसचे समथंन करणार असल्याचा दावा बोस यांनी केला आहे. राज्यघटनेचे रक्षण करत एक सांप्रदायिक नसलेले सरकार सत्तेवर आणायचे आहे. हे काम केवळ काँग्रेस पक्षच करू शकतो. राहुल गांधींच्या या संघर्षाचा हिस्सा होण्यासाठी मी काँग्रेसमध्ये सामील झाल्याचे बोस यांनी म्हटले आहे.









