प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur : शहरात सलग पाचव्या वर्षीही 100 टक्के पर्यावरणपूरक गणेशोत्सव होण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तब्बल 23 तास राबली. घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी मनपाचे कर्मचारी,अधिकारी शनिवारी सकाळपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत काम करत होते.
यामध्ये पवडी विभागाचे 500 कर्मचारी, आरोग्य विभागाचे 1200 कर्मचारी व आरोग्य निरीक्षकांच्या 16 टीम, 152 टेम्पो 374 हमाल, 5 जे.सी.बी.,7 डंपर, 4 टॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 2 बुम, 5 रूग्णवाहिका व 10 तराफे अशी यंत्रणा तैनात केली होती.पवडी विभागाने प्रभागातील विसर्जन कुंडात नागरिकांनी अर्पण केलेल्या गणेशमूर्ती टेम्पोमधून आणून इराणी खणीमध्ये विसर्जीत केल्या.
महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षिततेसाठी साधनसामुग्रीसह रात्रभर तैनात होते. विद्युत विभागाकडून विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था केली होती. ही व्यवस्था ऐनवेळी बंद पडू नये यासाठी स्वतंत्र टीमही येथे रात्रभर जागली. ज्यादा तराफे लावून 50 हमालांद्वारे स्वतंत्र गणेशमूर्ती विसर्जन करण्याची व्यवस्थाही केली होती. आरोग्य विभागामार्फत विसर्जन कुंड ठेवलेल्या ठिकाणी तसेच पंचगंगा नदीजवळील गायकवाड पुतळा परिसर व इराणी खण परिसराची स्वच्छता करण्याचे काम तसेच निर्माल्य संकलनाचे काम रविवारी सकाळपर्यंत सुरू होते.
दोन शिफ्टमधे काम केल्याने ताण कमी
नागरिकांनी विर्सजन केलेले निर्माल्य गोळा करण्याचे काम करण्यासाठी आरोग्य विभागाने 16 आरोग्य निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली प्रभागातील प्रत्येक विसर्जन कुंडाच्या ठिकाणी प्रत्येकी 2 प्रमाणे दोन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त केले होते.
व्हाईट आर्मीचेही मोलाचे योगदान
अशोक रोकडे यांची व्हाईट आर्मी आपत्त्कालीन परिस्थितीत नेहमीच धावून येते.घरगुतीसह सार्वजनिक गणेश मूर्तीवेळीही व्हाईट आर्मीची प्रशासनाला मौलाची मदत होते. इराणी खण येथे 75 जवान संकलित केलेल्या गणेशमूर्ती विसर्जन करत होते.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची मोहीम यांनी यशस्वी केली
प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ,केशव जाधव, उप-आयुक्त साधना पाटील, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त संजय सरनाईक,डॉ. विजय पाटील,मुख्य व लेखा वित्त अधिकारी सुनिल काटे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपहशहर अभियंता नारायण भोसले,एन.एस.पाटील, रमेश कांबळे, सतीश फप्पे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, मुख्य आरोग्य निरीक्षक सुधाकर चल्लावाड, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, वर्कशॉप प्रमुख चेतन शिंदे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे,जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चांगला प्रतिसाद
महापालिकेकडून पर्यावरणपूरक गणोशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते.शहरवासियांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे.मनपा यंत्रणाही रात्री उशिरापर्यंत यासाठी कार्यरत होती.पुढील वर्षी सर्वांनी या मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या चळवळीला बळ द्यावे.
रविकांत आडसुळ, अतिरिक्त आयुक्त, महापालिका