तरुणभारत ऑनलाइन
पावसाळ्याच्या दिवसात योग्य आहार घेणे खूप गरजेचे असते.कारण या दिवसात दूषित पाण्यामुळे तसेच वातावरणामुळे अनेक आजारही होतात. त्याचबरोबर पचनक्रियाही मंदावलेली असते.अशावेळी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डॉक्टर नेहमीच रोज एक फळ खाण्याचा सल्ला देतात.फळ हे आरोग्यासाठी चांगलं असते. त्यामुळे पावसाळ्यातही योग्य ती फळेदेखील खायला हवीत.आज आपण जाणून घेऊयात पावसाळ्यात कोणती फळे खावीत आणि त्यांचे फायदे काय आहेत.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही विशेष फळ बाजारात येत असतात.लीची,आलूबुखार,जांभूळ, पीच, नासपती ही फळे फक्त पावसाळ्यापुरती मर्यादित असतात.त्यामुळे ही फळे पावसाळ्यात लाभदायक ठरू शकतात.
लीची
पावसाळ्याच्या दिवसात बाजारात लीची हे फळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते.लहान दिसणारे हे फळ आंबट- गोड लागते.या फळात भरपूर पाणी अर्थात रस आहे.या फळाचे सेवन तहान आणि भूक भागवण्यास तसेच पचनक्षमता सुधारण्यास मदत करते.तसेच चेरीमुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तुम्हाला चांगली झोप येण्यासाठीही हे फळ फायदेशीर आहे.
डाळिंब
खरेतर हे फळ वर्षभर मिळते.पण शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी, पचनक्षमता सुधारण्यासाठी, पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी डाळींब हे फळ लाभदायी आहे. पावसाळ्यात डाळींब मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.
आलूबुखार
आलूबुखार या फळात भरपूर पाणी अर्थात रस आहे. या फळाची चव तशी आंबट असते.पण वेगळ्या चवीची असते याचे सेवन तहान आणि भूक भागवण्यास तसेच पचनक्षमता सुधारण्यास मदत करते. या फळात भरपूर फायबर आणि शरीराला आवश्यक असलेली खनिजे आहेत. तसेच हे फळ वजन कमी करण्यासाठी लाभदायी आहे.शिवाय हाडांच्या बळकटीसाठी, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आलुबुखार चांगले असते.
जांभूळ
पावसाळ्यात जांभूळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.मूत्रपिंडाशी संबंधित समस्या तसेच युरिक अॅसिडची समस्या दूर करण्यासाठी आणि इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी जांभूळ खातात. मधुमेह अर्थात डायबिटिसच्या रुग्णांना मर्यादित प्रमाणात जांभूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
पीच
पीच या फळात भरपूर अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन आहे. पीचची किंमतही इतर फळांच्या तुलनेत अधिक असते.पण शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यासाठी आणि त्वचेला तजेला आणण्यासाठी हे फळ लाभदायी आहे. पावसाळ्यात पीच मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.