कणकवली / प्रतिनिधी
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या कृती व वक्तव्याविरोधात कणकवलीत जोडो मारो आंदोलन आज दुपारी करण्यात आले . यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर ,भास्कर राणे ,सुनील पारकर ,संदेश पटेल, बाळू पारकर ,निलेश तेली ,प्रदीप तळगावकर, भाई पावस्कर ,दत्ताराम जाधव, आदी उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .









