वृत्तसंस्था/ कोलकाता
2024 च्या इंडियन सुपर लिग फुटबॉल हंगामात ईस्ट बंगाल एफसी संघाने आपला पहिला विजय नोंदविला. येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात ईस्ट बंगालने नॉर्थ-ईस्ट युनायटेड एफसी संघाचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला.
या सामन्यात ईस्ट बंगालचा एकमेव निर्णायक गोल डिमिट्रीओस डायमेनटेकोसने केला. या सामन्यात दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या. ईस्ट बंगाल संघाला या सामन्यातील विजयामुळे 3 गुण मिळाले.









