वृत्तसंस्था/ कोलकाता
2023 च्या ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी येथे झालेल्या अ गटातील अटीतटीच्या सामन्यात बंगालदेश आर्मी संघाने ईस्ट बंगाल संघाला 2-2 असे गोल बरोबरीत रोखले.
ईस्ट बंगाल आणि बांगलादेश आर्मी यांच्यातील सामन्यात मध्यंतरापर्यंत ईस्ट बंगालने 2-0 अशी आघाडी मिळविली होती. ईस्ट बंगालतर्फे क्रेस्पो आणि सिव्हीरो यांनी प्रत्येकी एक गोल केला. त्यानंतर बांगलादेश आर्मी संघातर्फे एस इमॉन आणि मिराज यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. हा सामना अनिर्णीत राहिल्याने ईस्ट बंगालने महत्त्वाचे दोन गुण गमविले. दिल्ली आणि हैदराबाद यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. आता हैदराबाद संघाचा पुढील सामना 10 ऑगस्टला चेन्नीयन संघाबरोबर होणार आहे.









