वृत्तसंस्था / पणजी
येथे सुरू असलेल्या 2025-26 च्या अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत बलाढ्या इस्ट बंगालने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी मोहन बागानला गोल शुन्य बरोबरीत राखून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
फातोर्ड्याच्या नेहरु स्टेडियमवर बागान आणि इस्ट बंगाल यांच्यातील चुरशीचा सामना गोल शुन्य बरोबरीत राहिला. इस्ट बंगाल संघाला या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी हा सामना अनिर्णीत राखणे जरुरीचे होते तर मोहन बागानला शेवटच्या संघात स्थान मिळविण्यासाठी किमान 3 गुणांची जरुरी होती. इस्ट बंगाल संघाने सरस गोल सरासरीच्या जोरावर मोहन बागानला मागे खेचत उपांत्य फेरी गाठली. इस्ट बंगालने +4 तर बागानने +2 अशी सरासरी राखली.









