न्यूयॉर्क :
उत्तर अटलांटिक महासागरात 6.4 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. युनायटेड स्टेट जियोलॉजिकल सर्व्हेनसार हा भूकंप अमेरिकेच्या प्राणवेळेनुसार सोमवारी रात्री 8.25 वाजता झाला आहे. याचे केंद्र जमिनीत 10 किलोमीटर खोलवर होते. या भूकंपानंतर त्सुनामीचा कुठलाच इशारा जारी करण्यात आलेला नाही.









