वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अंदमानच्या समुद्रात रविवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. रविवारी पहाटे 3.20 वाजता भूकंपाचे धक्के बसले. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची नोंद 10 किमी खोलीवर झाली आहे. आत्तापर्यंत कुठलीही हानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. तथापि, गेल्या आठवडाभरात वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. शनिवारी अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपातही मोठी जीवितहानी झाल्याने घबराट कायम आहे.