काबूल
अफगाणिस्तानच्या फैजाबादमध्ये मंगळवारी पहाटे सुमारे 5 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.1 इतकी होती. भूकंपाचे केंद्र फैजाबादपासून 89 किलोमीटर अंतरावर आणि 112 किलोमीटर खोलवर होते. यापूर्वी अफगाणिस्तानला 22 जून रोजी 6.1 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपात किमान 1 हजार लोकांचा मृत्यू झाला होता तर 1500 हून अधिक जखमी झाले होते.









