काठमांडू
नेपाळमध्ये गुरुवारी रात्री उशिरा भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा पहिला धक्का रात्री 11.58 वाजता जाणवला असून याची तीव्रता 4.8 इतकी होती. तर भूकंपाचा दुसरा धक्का रात्री दीडनंतर जाणवला आहे. भूकंपाच्या या धक्क्याची तीव्रता 5.9 इतकी होती. भूकंपाचे केंद्र दाहाकोट गावात जमिनीत 10 किलोमीटर खोलवर होते. या भूकंपामुळे कुठल्याही प्रकारच्या वित्तीय तसेच जीवितहानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.









