लॉस एंजिलिस
अमेरिकेच्या उत्तर कॅलिफोर्नियामध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी नोंद झाली आहे. अमेरिकेच्या जियोलॉजिकल सर्व्हेने यासंबंधी माहिती दिली आहे. तर कॅलिफोर्नियापासून 40 किलोमीटर अंतरावरील पोर्ट सिटी यूरेकामध्येही कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तेथे अद्याप त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आलेला नाही.









