वृत्तसंस्था/ पानिपत
हरियाणात मंगळवार, 19 डिसेंबर रोजी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. भूकंपानंतर धक्क्यांची जाणीव झालेले लोक घराबाहेर पडले. भूकंपाचे केंद्र पानिपत असल्याची माहिती भूकंपमापन केंद्राकडून देण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून जम्मू काश्मीर आणि लडाख भागात भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यापाठोपाठ आता नजिकच्या हरियाणा राज्यातील काही भागातही हादरे बसल्यामुळे लोक भयभीत झाले आहेत. मंगळवारी चीनमध्ये झालेल्या भूकंपात काही ठिकाणी पडझड झाली असून 100 हून अधिक जणांचे बळीही गेले आहेत.









