काठमांडू
भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.0 इतकी होती. भूकंपाचे धक्के जाणवल्यावर नेपाळमधील लोकांनी घराबाहेर धाव घेतली होती. नेपाळमध्ये हा भूकंप मंगळवारी पहाटे 4.30 वाजता जाणवला आहे. या भूकंपाचे केंद्र जमिनीत 25 किलोमीटर खोलवर होते. यापूर्वी म्यानमारमध्ये 28 मार्च रोजी 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे 3 हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर हजारो लोक अद्याप बेपत्ता आहेत.









