चंद्रपूर. गडचिरोली जिल्ह्यातही सौम्य धक्के
नागपूर
नागपूरमध्ये आज ( ४ रोजी) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. तेलंगणामधील भूकंपाशी संबंधित हे धक्के असल्याचे स्पष्ट झाले. नागपूरसोबतच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यालाही सौम्य धक्के जाणवले. नागपुरमधील बेसा, हुडकेश्वर, मनीष नगर, गोधनी, हनुमान नगर, पायोनियर कॉलनी या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाने कोठेही नुकसान झालेले नाही. तरी आम्ही नागपूर जिल्हा देखरेखी मध्ये ठेवलेला आहे. तरी नागरिकांनी सतर्क रहावे, दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








