श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार पहिला भूकंप रिश्टर स्केलनुसार 4.9 तीव्रतेचा तर दुसरा 4.8 तीव्रतेचा होता. या भूकंपात एक व्यक्ती जखमी झाला असून अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. भूकंपाचा पहिला धक्का सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी जाणवला तर याच्या काही मिनिटांमध्येच 6 वाजून 52 मिनिटाला दुसरा भूकंपाचा धक्का जाणवला. बारामुल्ला येथे भूकंपाचे केंद्र होते.









