डोडा जिल्हय़ात होते केंद्र
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्हय़ात शनिवारी भूकंपाचे दोन कमी तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे दोन धक्के मंगळवारी सकाळी काही तासांनी अंतराने जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता अनुक्रमे 2.9 आणि 3.4 इतकी होती. मंगळवारपासून आतापर्यंत जम्मूच्या डोडा, किश्तवाड, कटरा अन् उधमपूर जिल्हय़ांमध्ये कमी तीव्रतेचे एकूण 13 भूकंप झाले आहेत. भूकंपामुळे कुठल्याही जीवित तसेच आर्थिक हानीचे वृत्त प्राप्त झाले नसल्याचे अधिकाऱयांनी म्हटले आहे. पहाटे 4.32 वाजता जाणवलेल्या पहिल्या भूकंपाचे केंद्र भद्रवाह शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर अन् 10 किलोमीटर खोलवर होते. भूकंपाचा दुसरा धक्का सकाळी 9.06 वाजता जाणवला आणि याचे केंद्र डोडापासून 5 किलोमीटर अंतरावर होते.









