वृत्तसंस्था/ मिडानाओ
फिलिपाईन्समधील मिडानाओ येथे शनिवार, 2 डिसेंबरला 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, हा भूकंप रात्री 8:07 वाजता झाला. त्याचे केंद्र जमिनीत 50 किलोमीटर खोलीवर होते. भूकंपाची तीव्रता पाहता दक्षिण फिलिपाईन्ससह इंडोनेशिया, पलाऊ आणि मलेशियाच्या काही भागांमध्ये त्सुनामीच्या लाटा धडकण्याची शक्मयता असल्याचे पॅसिफिक त्सुनामी ईशारा केंद्राने सांगितले. त्यानंतर फिलिपाईन्सच्या सरकारी एजन्सीने मिडानाओच्या पूर्व किनाऱ्यावरील सुरिगाव डेल सुर आणि दावो ओरिएंटल प्रांतातील रहिवाशांना उंच भागात जाण्याचे निर्देश दिले आहेत.









