वृत्तसंस्था/ अंदमान
भारतातील अंदमान येथील सागरी बेटाजवळील समुद्रात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. रविवारी दुपारी 3.29 वाजता हा भूकंप झाला. समुद्रात झालेल्या भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नाही, मात्र अचानक लाटा उसळू लागल्यामुळे त्सुनामीची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, प्रशासनाकडून कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. मुख्य भूकंपानंतर पुन्हा धक्के न जाणवल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.









