वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जम्मू-काश्मीर विभागात मंगळवारी 5.4 रिष्टर क्षमतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे हादरे जवळपास संपूर्ण उत्तर भारताला जाणवले. दिल्ली आणि दिल्ली शहर भागात हे हादरे विशेषत्वाने जाणवले. मात्र, कोणतींही जीवीत हानी झाल्याचे वृत्त नाही. काही इमारतींना किरकोळ हानी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या भूकंपाचे पडसाद पाकिस्तानातही उमटले. इस्लामाबाद, लाहोर आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर हे धक्के जाणवले असल्याचे वृत्त देण्यात आले आहे. धक्के जाणवलेल्या भागातील लोकांनी त्वरित आपली घरे सोडली आणि ते बाहेर आल्याचे दिसून आले. अनेक ट्विटरप्रेमींनी भूकंप जाणवल्यानंतर त्वरित संदेश पाठवून इतरांना सावध करण्याचा प्रयत्न केला. काहींनी सोशल मिडियावर काही छायाचित्रेही एकमेकांना पाठविली आहेत.









