ऑनलाईन टीम / तरुण भारत :
हिंगोली जिल्ह्यातील 16 ते 18 गावांमध्ये आज पहाटे साडेचारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीने 3.6 रिश्टर स्केल अशी या भूकंपाची तीव्रता नोंदवली आहे. या भूकंपाने कोणतीही हानी झाली नाही.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या वसमत, औंढा व कळमनुरी या तीन तालुक्यातील जवळपास 16 ते 18 गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील कुरंदासह परिसरातील वापटी, कुपटी, पांगरा शिंदे, कळमनुरी तालुक्यातील बोल्डा परिसर औंढा तालुक्यातील पिंपळदरी, जलालदाभा, दुधाळा यासह अन्य काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
अधिक वाचा : विदर्भात थंडीची लाट








