नवारस्ता / प्रतिनिधी
कोयना धरण परिसर रविवारी पहाटे सौम्य धक्याने हादरून गेला. रविवार (दि.7 मे ) पहाटे 3 वाजून 53 वाजता कोयना परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपमापन केंद्रांवर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 3 रिश्टर स्केल एवढी नोंदली गेल्याची माहिती कोयना भूकंप प्रशासनाने दिली.
भूकंपाच्या केंद्रबिंदूचे अंतर कोयना धरणापासून 5 किलो मीटर अंतरावर उत्तरेला नोंद झाला असून या भूकंपाची खोली 30 किलोमीटर इतकी नोंद झाली आहे. दरम्यान, या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका झाला नसून धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा कोयना धरण व्यवस्थापना कडून देण्यात आला.








