6 रिश्टर स्केल तीव्रता, जीवितहानीचे वृत्त नाही
जकार्ता / वृत्तसंस्था
इंडोनेशियातील उत्तर सुलावेसी प्रांतात शनिवारी भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 6 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू केपुलान तालौद प्रांतापासून 45 किमी अंतरावर होता, अशी माहिती देशाच्या हवामानशास्त्र आणि जिओफिजिक्स एजन्सीकडून देण्यात आली. प्राथमिक टप्प्यात या नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे दिसून आले नाही. तथापि, तुर्कस्तान आणि सीरियामध्ये नुकत्याच झालेल्या भीषण आपत्तीच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये भूकंपामुळे घबराट पसरलेली दिसून येत आहे.
यापूर्वी इंडोनेशियाच्या पूर्वेकडील पापुआ प्रांतात गुरुवारी दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. या भूकंपात 4 जणांचा मृत्यू झाला होता. पापुआच्या उत्तर किनाऱयाजवळील जयपुरा येथील निवासी भागात समुदातील तरंगते रेस्टॉरंट कोसळल्यामुळे ही जीवितहानी झाली होती. या भूकंपाची तीव्रता केवळ 5.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती.









