अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर समुद्रात एक फॉल्ट लाइन आहे. ही फॉल्ट लाइन कुठल्याही दिवशी भयानक भूकंप आणि त्सुनामी घडवून आणू शकते, अशी भीती वैज्ञानिकांना आहे. ही फॉल्ट लाइन 600 मैल म्हणजेच 966 किलोमीटर लांबीची आहे. दक्षिण कॅनडापासून उत्तर पॅलिफोर्नियापर्यंत ही फॉल्ट लाइन आहे. वैज्ञानिकांनी अलिकडेच या सागरी भागाचा नकाशा तयार केला आहे. म्हणजेच अंडरवॉटर मॅपिंग केले आहे. या भागाला कॅसकेडिला सबडक्शन झोन म्हटले जाते. सर्वसाधारणपणे फॉल्ट लाइन दोन हिस्स्यांमध्ये विभागलेली असते, परंतु ही फॉल्ट लाइन चार तुकड्यांमध्ये विभागलेली असल्याने मोठ्या धोक्याचे संकेत मिळाले आहेत. येथील टेक्टोनिक प्लेट्समध्ये किंचित हालचाल झाली तरीही फॉल्ट लाइन मोठ्या प्रमाणात जमिनीच्या वरच्या पृष्ठभागावर विध्वंस घडवून आणणार आहे. यामुळे एका भूकंपानंतर अनेक आणि तीव्र भूकंप होण्याची शक्यता आहे. कॅसकेडिया सबडक्शन झोनमध्ये 9 पेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप घडवून आणण्याची क्षमता असल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे.
तर काय घडणार?
कॅलिफोर्नियाच्या सॅन एंड्रियास फॉल्ट लाइननजीक 8.3 तीव्रतेच भूकंप घडवून आणण्याची क्षमता आहे. जर 9 तीव्रतेचा भूकंप अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर झाला तर किती नुकसान होईल असा प्रश्न उपस्थित होतो. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर 100 फूट किंवा त्याहून अधिक उंचीच्या लाटा धडकतील, असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. यामुळे 10 हजार लोक मृत्युमुखी पडण्याची शक्यता आहे. तसेच केवळ ओरेगॉन आणि वॉशिंग्टनमध्ये 80 अब्ज डॉलर्स म्हणजेच 6.68 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
जपानमधील घटनेचा दाखला
2011 साली जपानमध्ये अधिक तीव्रतेचा भूकंप होत त्सुनामी आली होती. याचे कारण कॅसकेडिया सबडक्शन झोनसारखीच फॉल्ट लाइन होती. यामुळे 9 तीव्रतेचा भूकंप झाला, मग तीव्र त्सुनामी आली, यामुळे जपानमध्ये सुमारे 20 हजार लोक मारले गेले होते.पॅसकेडिया सबडक्शन झोन देखील असेच काहीसे घडवून आणेल अशी भीती वैज्ञानिकांना आहे. सर्वसाधारणपणे या झोनमध्ये दर 500 वर्षांनी तीव्र भूकंप होतो. मागील भूकंप 1700 साली झाला होता. पुढील भूकंप कधी होणार हे सांगणे अवघड आहे, परंतु जेव्हा कधी होईल तेव्हा मोठा विध्वंस घडेल. कारण पॅसकेडियाचे चार हिस्से अन्य फॉल्ट लाइनपेक्षा त्याला अधिक धोकादायक ठरवितात.









