प्रेक्षकांसाठी तयार करते व्हिडिओ
सद्यकाळात पैसे कमाविण्यासाठी केवळ अनोखी कल्पना सुचणे पुरेसे आहे. अलिकडेच ऑस्ट्रेलियात एक मॉडेल अत्यंत चर्चेत असून ती अत्यंत अजब पद्धतीने पैसे कमाविते. ही युवती स्वत:ला गुदगुल्या करून व्हिडिओ तयार करते आणि त्यापासून पैसे कमाविते. तिला गुदगुल्या करताना पाहण्यासाठी लोक लाखो रुपये देण्यास तयार होतात.
ऑस्ट्रेलियातील मॉडेल मिया बेली गुदगुल्या करून पैसे कमावत आहे. ती सब्सक्रिप्शन वेबसाइट ओन्लीपॅन्सवर कंटेंट क्रिएटर आहे. तिने लोकांची एक फेटिश समजून घेत त्याचाच लाभ घेत पैसे कमाविण्यास सुरुवात केली आहे. स्वत:ला गुदगुल्या करत त्याचे चित्रण करून तो व्हिडिओ ती इंटरनेटवर पोस्ट करते.
या कामातून वयाच्या 20 व्या वर्षीच मियाने स्वत:ची ड्रीम कार खरेदी केली हाती. काही महिन्यांतच ती एक संपत्ती खरेदी करणार आहे. हे काम सुरू करण्यामागील कारण आर्थिक स्वातंत्र्य आणि कामातील लवचिकता असल्याचे तिने सांगितले आहे.
अनोख्या कामातून ती आता इतकी रक्कम कमावत आहे की, आलिशान आयुष्य जगत आहे. तिचे चाहते तिच्यावर प्रचंड प्रेम करतात. ती आता स्वत:च्या मर्जीनुसार काम करते. कामाचा भार तिने स्वत:वर येऊ दिलेला नाही. तसेच या कामाद्वारे तिने स्वत:च्या परिवारालाही मोठी मदत करत त्यांच्या गरजा पूर्ण केल्या आहेत.









