महिलेने सुरू केला अजब व्यवसाय
सद्यकाळात एकाकीपणा वाढत चालला आहे. यामुळे लोकांमध्ये नैराश्यही वाढत आहे. अशा लोकांना काही प्रमाणात प्रेम दिले, तर त्यांनाही आपलेपणा वाटू शकतो आणि त्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण जागू शकतो. एका महिलेने सध्या विचित्र व्यवसाय सुरू केला आहे. ही महिला अनेळखी लोकांची गळाभेट घेत कमाई करते. परंतु या सत्रादरम्यान कुणी चुकीचे कृत्य केले तर ती त्याला शिक्षाही देते.
एलेक्सँड्रा कासपेरक पोलंड येथे राहते. तिने 2023 मध्ये कॅटोवाइस शहरात एक कडलिंग सलूनची सुरुवात केली होती. हे एक प्रोफेशनल कडलिंग सलून असून यात ग्राहक गळाभेट घेण्यासाठी येतात. एलेक्सँड्रा अनोळखी लोकांची गळाभेट घेते. तिचे ग्राहक हे एकाकीपणाला सामोरे जाणारे असतात.
तिच्या या सलूनचे नाव एनिया ओड प्रिझ्यतुलानिया आहे. एलेक्सँड्राला प्रारंभी या व्यवसायाला फारसा प्रतिसाद मिळणार नसल्याचे वाटले होते. परंतु आता तिच्या सलूनवर लोकांची गर्दी होऊ लागल्याने काही दिवस अगोदर बुकिंग करावे लागते. लोक येताच ती प्रथम त्यांना वेलकम हग देते, त्यानंतर एलेक्सँड्रा ग्राहकांना कोणत्या समस्या आहेत, मद्यपान केले आहे का अशी विचारणा करते. ग्राहक सुरक्षित असल्याची खात्री पटताच ती त्यांना शॉवर घेण्यास सांगते आणि वेगळे कपडे परिधान करण्यास देते. यानंतर ती त्यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांची गळाभेट घेते. हे पूर्ण सत्र 1 किंवा 2 तासांचे असते. हे अत्यंत प्रोफेशनली पार पाडले जाते. या
1 तासासाठी 3 हजारांचे शुल्क
गळाभेटीच्या या क्रियेत काहीच आक्षेपार्ह नसते. परंतु एखादा ग्राहक चुकीचे कृत्य करत असेल तर एलेक्सँड्रा शिक्षेच्या स्वरुपात सत्र त्वरित बंद करते अणि त्याला तेथून निघून जाण्यास सांगते. कडलिंग सेशनच्या एक तासासाटी 3100 तर 2 तासांच्या सेशनसाठी 6100 रुपयांचे शुल्क आकारले जाते. गळाभेटीचे हे सत्र खासप्रकारच्या सजविलेल्या कक्षात पार पडते, जेथे परफ्यूम, सजावटीच्या इतर गोष्टी, सॉफ्ट टॉय इत्यादी असतात. अनेक महिला देखील या सेवेचा लाभ घेत असतात.









