सोशल मीडियावर वेगवेगळ्या कंटेंटच्या मदतीने आज लोक लाखो कमावत आहेत. यात अनेक लोक असा कंटेंट देऊन कमाई करत आहेत, ज्याबद्दल कुणी विचारही करू शकते. अशाच प्रकारे एक महिला स्वत:च्या पायांच्या मदतीने मोठी कमाई करत आहे. पायांच्या छायाचित्रांद्वारे महिन्याला 5 लाखाहून अधिक रुपये कमावत असल्याचा खुलासा कंटेंट क्रिएटर अमेलियाने केला आहे.
अमेलिया सोशल मीडिया आणि स्वत:च्या वैयक्तिक साइटवर स्वत:च्या सुंदर पायांची छायाचित्रे अन् त्यांच्या देखभालीशी निगडित कंटेंट शेअर करत असते आणि मोठ्या संख्येत लोक तिला फॉलोही करतात. 28 वर्षीय अमेलिया स्वत:च्या क्लायंट्ससाठी स्वत:च्या पायांच्या बोटांना सुंदर राखण्यासाठी पूर्ण देखभाल करते. लंडनमध्ये राहणारी अमेलिया पायांची नखं योग्य स्थितीत असावीत हे सुनिश्चित करते. तिच्या पायांचे शौकिन असणारे फॉलोअर्स तिच्या कंटेंटसाठी मोठी रक्कम खर्च करत असतात.

स्वत:च्या पायांच्या छायाचित्रांद्वारे कमाई करता येते याची जाणीव झाल्यावर मी यालाच स्वत:ची उपजीविकेचे स्वरुप मिळवून दिल्याचे ती सांगते. आमेलियाची स्वत:ची वेबसाइट असून यावर ती कंटेंट शेअर करते. फन विथ फीटच्या माध्यमातून कशाप्रकारे लोकांशी संवाद साधते हे तिने सांगितले आहे. स्वत:चे पाय कसे सुंदर राखावेत याच्या टिप्स ती लोकांना देत असते.
दर महिन्याला सुमारे 5.21 लाख रुपये कमाविणाऱ्या अमेलियाकडे तिच्या पायांची छायाचित्रे आणि देखभालीशी संबंधित माहितीवरून वेगवेगळ्या रिक्वेस्ट प्राप्त होत असतात. तिचे फॉलोअर्स अजब डिमांड करत असतात. अमेलिया यापूर्वी एक नर्स होती, जी महिन्याकाठी 2.08 लाख रुपये कमावत होती. पूर्वी ती नोकरीसोबत कंटेंट क्रिएशन करत होती, परंतु नंतर ती पूर्णवेळ कंटेंट क्रिएटर झाली आहे. स्वत:च्या पायांची चांगली स्थिती राखण्यासाठी अमेलिया आठवड्यातून एकदा पेडीक्योर अणि पायांची मालिश करवित असते.









