केवळ गुड नाइट बोलण्याचे आकारते 1700 रुपये
एक महिला केवळ व्हॉइस मेसेज पाठवून कोट्यावधी रुपये कमावत आहे. केवळ गुड नाइट किंवा गुड मॉर्निंग बोलण्याचे ती 1700 रुपये आकारते. अमेरिकेतील 42 वर्षीय हॉली जेनसाठी हा पेशा ठरला आहे. तीन मुलांची आई आणि ओन्लीफॅन्स क्रिएटर हॉली आता स्वत:च्या टेक्सास अॅक्सेंटयुक्त आवाजमुळे दर महिन्याला हजारो डॉलर्स कमावत आहे.
अनेकदा मला डम्ब ब्लाँड अमेरिकन’च्या स्टीरियोटाइपमध्ये टाकले जायचे, परंतु हीच धारणा आता माझ्यासाठी वरदान ठरली आहे. लोक मला कमी लेखतात, परंतु हेच माझ्यासाठी उपयुक्त ठरले आहे. माझा आवाज आता माझे सर्व बिल भरत असल्याचे हॉलीने म्हटले आहे.
इन्स्टाग्रामवर तिचे 16 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ओन्लीफॅन्सवर तिची फॅनबेस खासकरून ब्रिटनमध्ये अत्यंत मजबुत आहे. हॉली केवळ व्हॉइस नोट्स रिकॉर्ड करून दर महिन्याला सुमारे 17 लाख रुपये कमाविते. याचबरोबर तिचे सरासरी मासिक उत्पन्न जवळपास 70 लाख रुपयांपर्यंत पोहोचते. एक छोटेसे ग्रीटिंग (म्हणजेच गुड मॉर्निंग किंवा गुड नाइट)करता 1700 रुपये, पर्सनलाइज्ड आवाजयुक्त व्हॉइस नोट्ससाठी 80000 रुपये ती आकारते. एकावेळी मोबाइलमध्ये 30 सेकंद बोलून ती शेकडो डॉलर्स कमाविते. तिला दररोज 6-8 व्हॉइस नोट्स रिक्वेस्ट प्राप्त होतात.
प्रारंभी मला माझा आवाज काहीसा अजब असल्याचे वाटायचे. परंतु ब्रिटिश पुरुष याला अत्यंत दिलासादायक आणि आकर्षक मानतात असे ती सांगते. हॉलीने 2021 मध्ये नर्स रिक्रूटरची नोकरी सोडत ओन्लीफॅन्स जॉइन केले होते. परंतु तिला यामुळे फटकाही बसला आहे.









