वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची सुटका : वागणुकीत सुधारणा झाल्याने सरकारचा निर्णय
बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 26 कैद्यांची सोमवारी सुटका करण्यात आली. वागणुकीत सुधारणा झाल्यामुळे या कैद्यांच्या सुटकेसाठी शिफारस करण्यात आली होती. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी रात्री त्या कैद्यांची सुटका करण्यात आली. कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या उपस्थितीत कैद्यांची मुक्तता करण्यात आली. कारागृहातील विशेष समितीने या कैद्यांच्या सुटकेसाठी शिफारस केली होती. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या सुटकेला हिरवाकंदील मिळाला. त्यामुळे सोमवारी सर्व 26 कैद्यांना मुक्त करण्यात आले. समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होताना जुन्या कटू आठवणी विसरून समाजात एकरूप व्हावे, समाजाचा एक प्रमुख घटक म्हणून प्रत्येकाने जीवन जगावे, वागणुकीत सुधारणा झाल्याने मुदतपूर्व सुटका करण्यात येत आहे. या संधीचा फायदा घेत यापुढे उत्तम जीवन जगावे, अशा शब्दात कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी मार्गदर्शन केले.
1) प्रवीणकुमार सपालिगा, रा. पेरिएडका, जि. मंगळूर, 2) रामण्णा ऊर्फ रामप्पा दाटनाळ, रा. मेळगट्टी, ता. सवनूर, जि. हावेरी, 3) मंजुनाथ चन्नगिरीयप्पा, रा. बेट्टहळ्ळी पाळ्या, ता. मागडी, जि. बेंगळूर, 4) सुभाष संदूर पांडेन, रा. बळ्ळारी, 5) मंगेश महादेव मंडोळकर, रा. वडगाव-बेळगाव, 6) जी. आर. अनंतमूर्ती, रा. गोपालमक्की, जि. चिक्कमंगळूर, 7) वीरभद्र हुलग्याप्पा दोडमनी, रा. कडदराबेंची, जि. अनंतपूर, आंध्रप्रदेश, सध्या रा. तिनईघाट, जोयडा, 8) धनंजय मुनियप्पा, रा. चरलपल्ली, ता. पेनुगोंडा, जि. अनंतपूर, आंध्रप्रदेश, 9) परसाप्पा सदाशिव कवटेकर, रा. गद्याळ, ता. जमखंडी, जि. बागलकोट. 10) मिरासाब फव्रुसाब जमादार, रा. महालिंगपूर, ता. मुधोळ, जि. बागलकोट, 11) परशुराम तिप्पण्णा गाजीपूर, रा. कुरुबगेरी, ता. हनगल, 12) बाळप्पा यल्लाप्पा कालेरी, रा. जक्कनायकोप्प, ता. बैलहोंगल, जि. बेळगाव, 13) संजू कलगौडा पाटील, रा. शेडबाळ, ता. कागवाड, जि. बेळगाव, 14) तुकाराम गणपती ऊर्फ बसवंत बेळगली, रा. कंकणवाडी, ता. रायबाग, जि. बेळगाव, 15) बसवराज राचप्पा काजगार, रा. उगारखोड, ता. सौंदत्ती, 16) नागप्पा फकिराप्पा नायकर ऊर्फ कल्लूर, ता. तुरमुरी, ता. बैलहोंगल, जि. बेळगाव, 17) एम. कृष्णाप्पा, रा. कोलनाडहळ्ळी, ता. बंटवाळ, जि. दक्षिण कन्नडा, 18) स्टीफन कोन्ने, रा. जयपूर, ता. मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल, 19) के. एस. रवी, रा. कोप्पलुमने, जि. हासन, 20) उदय परसाप्पा शिरहट्टी, रा. शिवापूर, ता. गोकाक, जि. बेळगाव, 21) रामण्णा ऊर्फ रामप्पा नागन्नावर, रा. तिगडोळी, ता. बैलहोंगल, जि. बेळगाव, 22) जेनू कुरबर कृष्णा, रा. येरलवळमुडी, जि. कोडगू, 23) सिद्धाप्पा लगमाप्पा पाटील, रा. अलदाळ, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, 24) अस्माबानू शहाबुद्दीन, रा. गौसियानगर, जि. म्हैसूर, 25) प्रेमा चंद्रू हरिजन, रा. तिरवळ्ळी, करकट्टनहळ्ळी, ता. हनगल, जि. हावेरी, सध्या राहणार, हब्बूवाडा, ता. कारवार, 26) नागप्पा यल्लाप्पा सोलण्णावर, रा. पटगुंदी, ता. गोकाक, जि. बेळगाव अशी मुदतपूर्व सुटका झालेल्या कैद्यांची नावे आहेत.









