अहमदाबादच्या डॉ. अल्पेश गांधींचे मत : ‘महिलांचे आरोग्य-नवा दृष्टिकोन’वर कार्यशाळा
बेळगाव : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली तरी महिलांमधील रक्ताची कमतरता (अॅनिमिया) प्रकर्षाने जाणवते. प्रसूतीच्या वेळी माता दगावण्याचे प्रमाणही अधिक आहे. अकाली मृत्यू रोखण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज आहे. खासकरून सर्व्हायकल कॅन्सरमुळे बळी जाणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठे आहे. ही खेदाची बाब आहे, असे अहमदाबाद येथील ज्येष्ठ स्त्राr-रोगतज्ञ डॉ. अल्पेश गांधी यांनी मांडले. येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित केलेल्या वैद्यकीय कार्यशाळेत महिलांचे आरोग्य व नवा दृष्टिकोन या विषयावर ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन करून डॉ. अल्पेश गांधी पुढे म्हणाले, महिलांमध्ये स्तन कॅन्सर व सर्व्हायकल कॅन्सर दिसून येत आहे. उपचार घेण्यास विलंब धोरणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. स्तन कॅन्सर बरा होऊ शकतो. तो लवकर दिसूनही येतो. सर्व्हायकल कॅन्सर निदान होण्यास विलंब होत असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. वेळेत उपचार करून मृत्यूचे प्रमाण घटविण्यासाठी प्रयत्न वाढविण्याची गरज आहे, असा सल्ला त्यांनी दिला. बालपणापासून महिला विविध आरोग्य समस्यांना तोंड देत आहेत. लिंगभेदामुळे त्या दुर्लक्षिल्या जातात. त्यामुळे त्यांना वेळेत उपचार, वैद्यकीय सल्ला मिळत नाही. त्यामुळेच अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. ऐन वयात लैंगिक समस्या, निपुत्रिकपणा, दीर्घकालीन किंवा अनियमित मासिक पाळी, अधिक रक्तस्राव आदी अनेक आजारांनी त्रस्त असणाऱ्यांना वेळेत उपचार मिळण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.nकेएलई अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिचर्सचे उपकुलगुरु डॉ. नितीन गंगणे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एन. एस. महांतशेट्टी, डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळाचे वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. एम. दयानंद, डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी, स्त्राrरोग व प्रसूती विभाग प्रमुख डॉ. अनिता दलाल, डॉ. एम. व्ही. जाली, डॉ. शांतला हेर्लेकर यावेळी उपस्थित होते. डॉ. स्वप्नील पट्टणशेट्टी यांनी आभार मानले.









